बिबट्या : बिबट्याचा रूपकात्मक वापर करून दिग्दर्शकाने ‘माणसातल्या बिबट्या’ला अतिशय शिताफीने जेरबंद केले आहे!
समाजातील पितृसत्ताक व्यवस्थेचे अतिशय क्रूर रूप दिग्दर्शकाने पडद्यावर दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या पुरुषप्रधान व्यवस्थेने आपले खाजगी आणि सार्वजनिक अवकाश कशा पद्धतीने व्यापले आहे, याची प्रचिती या लघुपटातील अनेक प्रसंगातून आपल्याला सातत्याने येत राहते. या दमणकारी व्यवस्थेच्या सर्वांत जास्त स्त्रिया कशा बळी आहेत, हे नग्न सत्य आपल्या समोर या लघुपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उलगडत राहते.......